मुंबई :
'आई, मी जेवायला घरी येतेय...' लेकीचा रात्री उशिरा आलेला फोन आईसाठी शेवटचा ठरला. घरी पोहोचण्याआधीच नियतीने सिद्रा शेख (१८) हीचा जीव घेतला अन् अंधेरीतील शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी तिचे वडील मरियम शेख (४५) यांच्या तक्रारीनुसार बांगूरनगर पोलिसांनी अनिकेत सिंग (२५) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सिद्रा ऑगस्ट २०२५ पासून मालाड पश्चिमेतील एका कंपनीत नोकरीला होती. २८ फेब्रुवारी रोजी ती कामावर गेली होती. तिने १ मार्चला रात्री १२:४५ वाजता आईला फोन करून ती जेवणासाठी घरी येत असल्याचे सांगितले. 'काय खाणार आहेस?' असे आईने विचारले असता, 'घरी येतेय,' एवढेच ती म्हणाली. मात्र, रात्री १:४५ वाजता अनोळखी मोबाइलवरून अनिकेत सिंग (२५) याचा फोन आला. 'माझा आणि सिद्राचा अपघात झाला आहे, लवकर शताब्दी हॉस्पिटल, कांदिवली येथे या,' असे त्याने सांगितले. मरियम यांनी मुलगा साहिलसह रुग्णालय गाठले. मात्र, डॉक्टरांनी रात्री २:१५ वाजता सिद्राला दाखलपूर्व मृत घोषित केले.
श्वान मध्येच आल्याने अपघातअनिकेतच्या म्हणण्यानुसार, ड्युटी संपल्यानंतर कॅबची वाट पाहत असलेल्या सिद्रा हिला त्याने दुचाकीवर बसवले. सनराज कॉर्पोरेट पार्क, फोर्थ डायमेन्शन बिल्डिंग गेटजवळ रस्त्याचे काम सुरू असून बॅरिकेड्स लावलेले होते. तेथे समोर श्वान आल्याने दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटून दोघेही पडले. सिद्राच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. अनिकेतच्या डोके, हात व पाठीला दुखापत झाली.
Web Summary : Sidra, 18, died in a motorcycle accident after calling her mother to say she was coming home for dinner. A dog ran into the road, causing the accident. Police have registered a case against the driver, Aniket Singh.
Web Summary : सिद्रा, 18 वर्ष, ने अपनी माँ को फोन किया कि वह खाने के लिए घर आ रही है और फिर एक मोटरसाइकिल दुर्घटना में उसकी मौत हो गई। एक कुत्ता सड़क पर आ गया, जिससे दुर्घटना हुई। पुलिस ने ड्राइवर अनिकेत सिंह के खिलाफ मामला दर्ज किया है।