भाजपा-मनसे राड्याप्रकरणी १८ जणांना अटक

By Admin | Updated: March 15, 2016 02:02 IST2016-03-15T02:02:34+5:302016-03-15T02:02:34+5:30

मालाड येथे भाजपा आणि मनसेमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी १८ जणांना कुरार पोलिसांनी अटक केली. यामध्ये मनसेचे १६ कार्यकर्ते आणि भाजपाच्या २ कार्यकर्त्यांचा समावेश आहे

18-man arrested in BJP-MNS raid | भाजपा-मनसे राड्याप्रकरणी १८ जणांना अटक

भाजपा-मनसे राड्याप्रकरणी १८ जणांना अटक

मुंबई: मालाड येथे भाजपा आणि मनसेमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी १८ जणांना कुरार पोलिसांनी अटक केली. यामध्ये मनसेचे १६ कार्यकर्ते आणि भाजपाच्या २ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रकरणी उर्वरीत आरोपींचा शोध कुरार पोलीस
घेत आहेत. भाजपाच्या उत्तर
भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंविरुद्ध भूमिका घेतल्याने शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयावर हल्ला चढविला. त्या वेळी भाजपा आणि मनसेचे कार्यकर्ते भिडल्याने वातावरण चिघळले होते. परिस्थिती नियंत्रणात आणत असताना कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एल. व्हनमानेसह चार पोलिसही किरकोळ जखमी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: 18-man arrested in BJP-MNS raid