Join us

सांताक्रूझ येथील विशेष मुलांच्या शाळेतील पात्र १७ मुलांना मिळणार १००० रुपये पेन्शन

By मनोहर कुंभेजकर | Updated: November 11, 2022 19:40 IST

सांताक्रूझ येथील विशेष मुलांच्या शाळेतील पात्र १७ मुलांना मिळणार १००० रुपये पेन्शन मिळणार आहे.  

मुंबई : सांताक्रूझ पूर्व येथील येथील एच पूर्व वॉर्ड ऑफिस शेजारील मनपा शाळेत तळमजल्यावरील घरकुल या विशेष मुलांच्या शाळेतील स्वमग्न (ऑटिस्टिक) पात्र १७ मुलांना कार्यालयीन कागदपत्र पूर्तता केवळ तीन कार्यालयीन दिवसात पूर्ण करून घेऊन पेन्शन मंजुरी आदेश आज विद्यार्थी लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. १ डिसेंबर पासून त्यांना दरमहा १०००/- रुपये संजय गांधी निराधार पेन्शन मिळणार आहे. आज सायंकाळी ५.३० वाजता सदर शाळेत आज एका कार्यक्रमात पेन्शन मंजुरी आदेश प्रदान करण्यात आले. 

यावेळी घरकुलचे विश्वस्त सुनील सातपुते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा वाकळे, अंधेरीचे तहसीलदार सचिन भालेराव, पात्र लाभार्थी आणि पालक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी सर्जेराव सोनवणे  होते. आम्हाला अर्ज भरल्यावर चार पाच दिवसात पेन्शन मंजूर झाले हा अनपेक्षित सुखद धक्का होता अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली. तर अद्याप अपंग प्रमाणपत्र प्राप्त नसल्याने काही अर्ज मंजूर करता आले नाहीत, ते पुढील आठवड्यात पूर्ण करून घेऊ असे नायब तहसीलदार  बाळासाहेब माने यांनी सांगितले. मंडळ अधिकारी वांद्रे संजय सोनंदकर, तलाठी पायल डामसे,किरण ठबे, निलेश सावंत, मनोज पल्लेवाड या कर्मचाऱ्यांनी शालेय वेळात पालकांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष कष्ट घेतले. 

 

टॅग्स :मुंबईशाळानिवृत्ती वेतनविद्यार्थी