Join us

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी १६६ विशेष मेल, एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 05:15 IST

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावरून करमळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणे या स्थानकापर्यंत जाण्यासाठी तब्बल १६६ विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावरून करमळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणे या स्थानकापर्यंत जाण्यासाठी तब्बल १६६ विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत.

मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेसच्या २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत २६ फेऱ्या चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ०१००१ मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेस मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून सुटेल. ही मेल, एक्स्प्रेस सावंतवाडीला दुपारी २ वाजून १० मिनिटांला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१००२ सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी ३ वाजता सावंतवाडीहून सुटेल. गाडी क्रमांक ०१००७ मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेसच्या १२ फेऱ्या चालविण्यात येतील. २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी ती रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल. गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस दुपारी ३ वाजता सुटेल.

गाडी क्रमांक ०१०३३ मुंबई-रत्नागिरी-पनवेल २८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत २२ फेऱ्या चालविण्यात येतील. ती सीएसएमटीहून सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल, तर गाडी क्रमांक ०१०३४ रत्नागिरीहून रात्री १० वाजून ५० मिनिटांनी सुटेल. याचप्रमाणे, पनवेल-सावंतवाडी-मुंबई २२ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेडणे ६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते झाराप ६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस-झाराप-पनवेल ८ फेऱ्या, पनवेल-सावंतवाडी ८ फेऱ्या, पनवेल-थिवीम ८ फेऱ्या, पुणे-रत्नागिरी ६ फेऱ्या (व्हाया कर्जत-पनवेल), पुणे-करमळी २ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

टॅग्स :रेल्वे