अवैध रेती नेणार्‍या नऊ गाड्यांसह १६ आरोपी ताब्यात

By Admin | Updated: May 16, 2014 02:26 IST2014-05-16T02:26:38+5:302014-05-16T02:26:38+5:30

विरार पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनापरवाना रेतीच्या ९ गाड्यांसह १६ आरोपींना ताब्यात घेतले. विरार पोलिसांनी खनिवडे येथे केलेल्या कारवाईत १६ आरोपींसह ९ रेतींचे ट्रकसह ८१ लाखांचा माल जप्त केला आहे.

16 accused, including nine carriages of illegal sand | अवैध रेती नेणार्‍या नऊ गाड्यांसह १६ आरोपी ताब्यात

अवैध रेती नेणार्‍या नऊ गाड्यांसह १६ आरोपी ताब्यात

पारोळ : विरार पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनापरवाना रेतीच्या ९ गाड्यांसह १६ आरोपींना ताब्यात घेतले. विरार पोलिसांनी खनिवडे येथे केलेल्या कारवाईत १६ आरोपींसह ९ रेतींचे ट्रकसह ८१ लाखांचा माल जप्त केला आहे. आरोपी जगन्नाथ चव्हाण, ज्ञानबा सूर्यवंशी, राजू राठोड, सुरेश राठोड, धर्मा राठोड, विलास चव्हाण, किरण राठोड, उन्नू राठोड, शिवकुमार सरोज, दास चव्हाण, दिनराव गुंडारे, भिमा राठोड, वासू राठोड, संतोष राठोड यांना अटक केली आहे. या प्रत्येक ट्रकमध्ये अडीच ब्रास रेती असून या सगळ्या गाड्यात एकूण २३ ब्रास विनापरवाना रेती होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विनापरवाना रेतीच्या वाहतुकीवर ही सर्वात मोठी कारवाई आहे. या सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असून विरार पोलीस निरीक्षक कोईंगर व उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: 16 accused, including nine carriages of illegal sand