सुशांतसिंगच्या मृत्यूशी संबंधित दिवसाला १५० कॉल्स!, हेल्पलाइन ‘हितगुज’ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 03:01 AM2020-07-11T03:01:10+5:302020-07-11T07:13:42+5:30

सुशांतच्या मृत्यूने जगभरात असलेल्या त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. या घटनेला दोन आठवडे उलटूनसुद्धा त्यांना हे विसरणे कठीण झाले आहे. सुशांतच्या अशा एक्झिटने नैराश्यात गेलेल्या तरुणाईने समुपदेशन करणाºया ‘हितगुज’ या हेल्पलाइनवर संपर्क करण्यास सुरुवात केली आहे.

150 calls a day related to Sushant Singh's death !, helpline 'Hitguj' information | सुशांतसिंगच्या मृत्यूशी संबंधित दिवसाला १५० कॉल्स!, हेल्पलाइन ‘हितगुज’ची माहिती

सुशांतसिंगच्या मृत्यूशी संबंधित दिवसाला १५० कॉल्स!, हेल्पलाइन ‘हितगुज’ची माहिती

Next

- गौरी टेंबकर - कलगुटकर 
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत (३४) याच्या मृत्यूमुळे निराश झालेल्या लोकांकडून हेल्पलाइन ‘हितगुज’वर येणाऱ्या फोनकॉल्सची संख्या वाढली आहे. दिवसाला जवळपास १५० फोन कॉल्स संबंधित समुपदेशक आता अटेंड करीत आहेत. ज्यात कॉल्सवरून लोकांमध्ये असलेली कोरोनाची भीती काहीशी कमी होऊन ते स्वत:ला या घटनेशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुशांतच्या मृत्यूने जगभरात असलेल्या त्याच्या फॅन्सना मोठा  धक्का बसला आहे. या घटनेला दोन आठवडे उलटूनसुद्धा त्यांना हे विसरणे कठीण झाले आहे. सुशांतच्या अशा एक्झिटने नैराश्यात गेलेल्या तरुणाईने समुपदेशन करणाºया ‘हितगुज’ या हेल्पलाइनवर संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पूर्वी दिवसाला २५ ते ३० या संख्येने येणारे कॉल्स आता १०० ते १५० च्या घरात जाऊन पोहोचले आहेत. कोरोनामुळे डळमळीत झालेल्या आर्थिक स्थितीमुळे ‘हेल्पलाइन’वर कॉल्सचा महापूर आला होता. मात्र त्यात आता लाडक्या अभिनेत्याशी स्वत:ला जोडून प्रश्न विचारले जात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. त्यापैकी दोन प्रकरणांचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा-

‘देअर इझ नथिंग फॉर स्ट्रगलर’!
इंदोरचा राहणारा आणि वडिलांच्या मर्जीविरोधात बॉलीवूडमध्ये नशीब  आजमावण्यासाठी घरातून पळून मुंबईत आलेल्या स्ट्रगलिंग अभिनेत्याने ‘हितगुज’वर संपर्क साधला. सुशांतच्या मृत्यूचा हवाला देत ‘देअर इझ नथिंग फॉर स्ट्रगलर,’ असे सांगत सुशांत मोठा स्टार होता तरी त्याने असे पाऊल उचलले; तर मग आम्ही काय टिकणार त्याच्यासमोर,’ असा प्रश्न त्याने सम्ांुपदेशकांना विचारला. बॉलीवूड बाहेरच्या माणसाला टिकू देत नाही हा त्याचा समज पक्का झाला होता. समुपदेशन झाल्याने त्याने आयुष्य नव्याने जगण्याचा निर्धार केला; आणि वडिलांच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला.

...तर मी सुशांतसारखे पाऊल उचलू का?
नवी मुंबईत राहणाºया एका तरुणीने या ठिकाणी संपर्क साधत चार वर्षांपासून प्रेमसंबंध असलेला तरुण लग्नासाठी हो-नाही म्हणत असल्याचे सांगितले. त्यामुळे सुशांतने जे पाऊल उचलले ते मी उचलू का? किंवा प्रियकराला तसे बजाऊ का, असा सवाल तिने ‘हितगुज’ला केला. संबंधित समुपदेशकांनी योग्य प्रकारे तिला समुपदेशन देत ‘नकार’ आलाच तर तो कसा पचवायचा आणि आपल्यावर प्रेम करणाºया पालकांचा व भावंडांचा त्या वेळी विचार करायचा याबाबत मार्गदर्शन केले.

‘डर’ के आगे जीतच आहे!
माणसाच्या आयुष्यात उतार-चढाव हे येतच राहतात. सुशांतच्या प्रकरणाकडे पाहिले तर बºयाचदा नकारात्मकतेमध्ये अडकल्याने आपण घाबरतो, आपल्याला भीती वाटते आणि आयुष्याच्या मार्गावर पुढे असलेल्या ‘बेस्ट’ संधींना हुकतो. त्यामुळे अपयश आलेच तर आपल्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत हे लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो याची तयारी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ‘डर के आगे जीत है’ असे म्हणतात. त्यामुळे तीच बाब आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाईल आणि आत्महत्येसारख्या विचारांपासून आपण परावृत्त होऊ.
- शुभांगी पारकर, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: 150 calls a day related to Sushant Singh's death !, helpline 'Hitguj' information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.