१५ हजार मुंबईकरांनी घेतला ‘जीवन ज्योती विमा’चा लाभ; वर्षाला ४३६ रुपये भरून योजनेतून वारसाला मिळते २ लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:20 IST2025-05-21T16:20:26+5:302025-05-21T16:20:42+5:30
२ वर्षे पूर्ण होण्याच्या आत कोणत्याही व्यक्तीने रखडलेल्या प्रीमियमची पूर्ण रक्कम भरल्यास त्याला योजनेचा पुन्हा लाभ घेता येतो.

१५ हजार मुंबईकरांनी घेतला ‘जीवन ज्योती विमा’चा लाभ; वर्षाला ४३६ रुपये भरून योजनेतून वारसाला मिळते २ लाखांची मदत
मुंबई : केंद्र सरकारने नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू केली आहे. वर्षाला ४३६ रुपये भरून या विमा योजनेचा लाभ घेता येतो. कोणत्याही कारणाने विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला २ लाख रुपये देण्यात येतात. या योजनेचा १५,९४० मुंबईकरांनी लाभ घेतला आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी ४३६ रुपये प्रीमियम भरावा लागतो. १५ ते ३० मे या दरम्यान विमाधारकाच्या खात्यातून ही रक्कम वळती केली जाते. ही योजना एलआयसी, इतर विमा कंपन्या, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येते. १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती वैयक्तिक किंवा संयुक्तिक (पती-पत्नी) या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
परवडणारा प्रीमियम, सोपी नोंदणी प्रक्रिया, एक वर्षासाठी जीवन विमा तसेच वयाच्या ५५ वर्षांपर्यंत जीवन विमा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत. मात्र, योजनेच्या नोंदणी तारखेपासून पहिल्या ३० दिवसांत मृत्यू झाल्यास (अपघात वगळता) त्या व्यक्तीच्या वारसाला विमा संरक्षणाचा लाभ मिळत नाही.
२ वर्षे पूर्ण होण्याच्या आत कोणत्याही व्यक्तीने रखडलेल्या प्रीमियमची पूर्ण रक्कम भरल्यास त्याला योजनेचा पुन्हा लाभ घेता येतो.
योजना कधी संपुष्टात येते?
वयाची ५५ वर्षे पूर्ण झाल्यावर
बँकेतील खाते बंद करणे
विमा चालू ठेवण्यासाठी बँकेत अपुरी शिल्लक
प्रीमियम कसा भरला जाईल?
भूकंप, पूर, इतर नैसर्गिक
आपत्ती, आत्महत्या, खून
यामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना योजनेमधून लाभ मिळू शकतो.
नोंदणीवेळी ग्राहकाने दिलेल्या संमतीनुसार खातेधारकाच्या बँक, पोस्ट ऑफिस खात्यामधून ‘ऑटो डेबिट’ सुविधेद्वारे ही रक्कम वळती करण्यात येते.
नोंदणी कालावधी वार्षिक प्रीमियम देय प्रशासकीय
प्रीमियम विनियोग गणना कमिशन खर्च
जून ते ऑगस्ट ४३६.०० ३९५.०० ३०.०० ११.००
सप्टेंबर ते नोव्हेंबर ३४२.०० ३०९.०० २२.५० १०.५०
डिसेंबर ते फेब्रुवारी २२८.०० २०६.०० १५.०० ७.००
मार्च ते मे ११४.०० १०३.०० ७.५० ३.५०