अनुकंपा तत्त्वानुसार १५ जणांना नोकरी

By Admin | Updated: October 16, 2015 03:09 IST2015-10-16T03:09:55+5:302015-10-16T03:09:55+5:30

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अनुकंपा तत्त्वानुसार नोकरीसाठी पात्र असलेल्या १५ जणांची आता अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.

15 people to work as per compassionate principle | अनुकंपा तत्त्वानुसार १५ जणांना नोकरी

अनुकंपा तत्त्वानुसार १५ जणांना नोकरी

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अनुकंपा तत्त्वानुसार नोकरीसाठी पात्र असलेल्या १५ जणांची आता अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. वर्ग-३ व ४ अंतर्गत पदावरील नियुक्तीपत्राचे त्यांना उद्या (शुक्रवारी) वाटप केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शासन निर्णयानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी गट क आणि ड मध्ये प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या १० टक्के इतकी मर्यादा आहे.
त्यानुसार म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावला आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते प्राधिकरणाच्या वांद्रेतील मुख्यालयात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

Web Title: 15 people to work as per compassionate principle