मध्य रेल्वेवर नवीन वर्षात आणखी १५ डबा लोकल, सीएसएमटीतील फलाटांचे काम डिसेंबरपर्यंत मार्गी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:54 IST2025-08-03T13:49:30+5:302025-08-03T13:54:09+5:30
लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना गर्दीमुळे नाहक जीव गमवावा लागतो. दोन महिन्यांपूर्वी मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनच्या वेळेत पाच जणांचा जीव गेला होता. त्यावर उपाय म्हणून दरवाजा बंद लोकल आणण्याचे जाहीर केले. मात्र, त्याआधी पंधरा डब्यांच्या लोकल वाढवण्याचे मध्य रेल्वेने ठरवले आहे.

मध्य रेल्वेवर नवीन वर्षात आणखी १५ डबा लोकल, सीएसएमटीतील फलाटांचे काम डिसेंबरपर्यंत मार्गी
मुंबई : मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकातील फलाट क्रमांक ५ व २ ची लांबी वाढविण्यात येणार असून, हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे २०२६ मध्ये १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये ४० पेक्षा जास्त वाढ होणार आहे.
लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना गर्दीमुळे नाहक जीव गमवावा लागतो. दोन महिन्यांपूर्वी मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनच्या वेळेत पाच जणांचा जीव गेला होता. त्यावर उपाय म्हणून दरवाजा बंद लोकल आणण्याचे जाहीर केले. मात्र, त्याआधी पंधरा डब्यांच्या लोकल वाढवण्याचे मध्य रेल्वेने ठरवले आहे.
प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे, सिग्नल यंत्रणेत केले बदल
काही वर्षांपूर्वी नऊ डब्यांच्या लोकल १२ डब्यांच्या करण्यात आल्या. त्यानंतर काही लोकलच्या डब्यांची संख्या १५ पर्यंत वाढवण्यात आली.
या लोकल चालवण्यासाठी मध्य रेल्वेने काही महत्त्वाच्या स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली.
सिग्नल यंत्रणेत काही बदल केले. मात्र, नंतर या १५ डब्यांच्या लोकल वाढवण्यात आल्या नाहीत. परिणामी, या फेऱ्या मर्यादित ठेवल्या आहेत.
सर्वच लोकल १५ डब्यांच्या हव्यात
प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व लोकल १५ डब्यांच्या करण्यासाठी सर्व स्टेशनमधील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याची गरज आहे.