२०२३मध्ये १५ कोटी लोकांनी केला विमानप्रवास; डीजीसीएकडून आकडेवारी प्रसिद्ध
By मनोज गडनीस | Updated: January 16, 2024 17:54 IST2024-01-16T17:54:36+5:302024-01-16T17:54:50+5:30
२०२३ च्या शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबरमध्य देशात १ कोटी ३७ लोकांनी प्रवास केला.

२०२३मध्ये १५ कोटी लोकांनी केला विमानप्रवास; डीजीसीएकडून आकडेवारी प्रसिद्ध
मुंबई - नुकत्याच संपलेल्या २०२३ च्या वर्षामध्ये देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असून सरत्या एका वर्षात तब्बल १५ कोटी २० लाख लोकांनी प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे. नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) या संदर्भात आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. २०२२ या वर्षामध्ये १२ कोटी ३२ लाख लोकांनी विमान प्रवास केला होता. त्या तुलनेत सरत्या वर्षी विमान प्रवाशांच्या संख्येत ८.३४ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
२०२३ च्या शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबरमध्य देशात १ कोटी ३७ लोकांनी प्रवास केला. नाताळ व नववर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासांच्या संख्येत ही वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, देशांतर्गत विमान प्रवासात इंडिगो विमान कंपनीने आपला अव्वल क्रमांक कायम राखत ६०.५ टक्क्यांची हिस्सेदारी मिळवली आहे. इंडिगो कंपनीच्या विमानाने एकूण ९ कोटी १९ लाख लोकांनी प्रवास केला.