मासिक पाळीच्या त्रासामुळे १४ वर्षीय मुलीचा गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 06:35 IST2024-03-27T06:35:31+5:302024-03-27T06:35:58+5:30

मुलीचे नातेवाईक व शेजाऱ्यांनी तिच्या गळ्यातील फास काढून बेशुद्धावस्थेत तिला कांदिवलीच्या जनकल्याणनगर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.

14-year-old girl hanged due to menstrual problems | मासिक पाळीच्या त्रासामुळे १४ वर्षीय मुलीचा गळफास

मासिक पाळीच्या त्रासामुळे १४ वर्षीय मुलीचा गळफास

मुंबई : पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यानंतर त्रास होत असल्याच्या नैराश्यातून १४ वर्षीय मुलीने ओढणीने गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली. मालवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली.
 मुलीचे नातेवाईक व शेजाऱ्यांनी तिच्या गळ्यातील फास काढून बेशुद्धावस्थेत तिला कांदिवलीच्या जनकल्याणनगर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासून तिला संध्याकाळी ७ वाजेदरम्यान मृत घोषित केले. मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आल्याने त्रास होत असल्याच्या नैराश्यातून तिने गळफास लावून घेतल्याचे नातेवाइकांनी प्राथमिक चौकशीमध्ये सांगितले. त्यांचा जबाब नोंदविला असून, या घटनेबाबत कोणताही संशय अथवा तक्रार नसल्याचे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.

Web Title: 14-year-old girl hanged due to menstrual problems

टॅग्स :Mumbaiमुंबई