CoronaVirus: खासगी कंपनीच्या जहाजावर अडकलेल्या १३२ प्रवाशांच्या सुटकेचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 05:06 IST2020-04-23T05:04:26+5:302020-04-23T05:06:01+5:30
मुख्यमंत्री कार्यालयाकडून झालेल्या प्रयत्नांमुळे केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची सशर्त परवानगी

CoronaVirus: खासगी कंपनीच्या जहाजावर अडकलेल्या १३२ प्रवाशांच्या सुटकेचा मार्ग मोकळा
वसई : मागील महिनाभरापासून मुंबईजवळील समुद्रात काही अंतरावर ‘मरेल्ला डिस्कव्हरी-१’ या खासगी कंपनीच्या प्रवासी जहाजावर १३२ भारतीय प्रवासी अडकून पडले होते. या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून झालेल्या प्रयत्नांमुळे केंद्रीय
नौकानयन मंत्रालयाची सशर्त परवानगी मिळाल्यामुळे या प्रवाशांना आता दिलासा मिळाला आहे.