13 rescued in Colaba fire, 1 firefighter injured | कुलाब्यातील आगीतून १३ जणांची सुखरुप सुटका, अग्निशमन दलाचा १ जवान जखमी

कुलाब्यातील आगीतून १३ जणांची सुखरुप सुटका, अग्निशमन दलाचा १ जवान जखमी

मुंबई : कुलाबा येथील कफ परेडमधल्या तळमजला अधिक पंधरा माळ्याच्या जलतरंग या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील एका घरास बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील वीजपुरवठा खंडित करत आग शमविण्याचे काम हाती घेतले. आगीमुळे इमारतीमध्ये धूर पसरला होता. यावेळी १३ आणि १४ मजल्यावर अडकलेल्या १० व्यक्तींसह २ मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली. तेराव्या माळ्यावर अडकलेल्या महिलेचीही सुखरुप सुटका करण्यात आली. या घटनेत अग्निशमन दलाचे जवान शैलेश मनोहर पाष्टे हे जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 13 rescued in Colaba fire, 1 firefighter injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.