कुलाब्यातील आगीतून १३ जणांची सुखरुप सुटका, अग्निशमन दलाचा १ जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 21:43 IST2020-06-03T21:43:11+5:302020-06-03T21:43:22+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील वीजपुरवठा खंडित करत आग शमविण्याचे काम हाती घेतले.

कुलाब्यातील आगीतून १३ जणांची सुखरुप सुटका, अग्निशमन दलाचा १ जवान जखमी
मुंबई : कुलाबा येथील कफ परेडमधल्या तळमजला अधिक पंधरा माळ्याच्या जलतरंग या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील एका घरास बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील वीजपुरवठा खंडित करत आग शमविण्याचे काम हाती घेतले. आगीमुळे इमारतीमध्ये धूर पसरला होता. यावेळी १३ आणि १४ मजल्यावर अडकलेल्या १० व्यक्तींसह २ मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली. तेराव्या माळ्यावर अडकलेल्या महिलेचीही सुखरुप सुटका करण्यात आली. या घटनेत अग्निशमन दलाचे जवान शैलेश मनोहर पाष्टे हे जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.