Join us

१३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 06:20 IST

राज्य सरकारने आज भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील अधीक्षक, उपायुक्त संवर्गातील १३ अधिकाºयांच्या बदल्या केल्या.

मुंबई : राज्य सरकारने आज भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील अधीक्षक, उपायुक्त संवर्गातील १३ अधिकाºयांच्या बदल्या केल्या. औरंगाबादचे पोलीस उपायुक्त सी.के.मिना यांची बदली पोलीस अधीक्षक, लोहमार्ग; औरंगाबाद येथे करण्यात आली. मुंबई शह पोलीस उपायुक्त निर्मलादेवी हे नागपूर येथे पोलीस उपायुक्त म्हणून जातील. वर्धेचे जिल्हा पोलीस अधीक्षक निसार तांबोळी आता राज्य गुप्तवार्ता विभाग; मुंबई येथे नवे उपायुक्त असतील. पोलीस अधीक्षक, लोहमार्ग; पुणे बसवराज तेली हे वर्धेचे नवे पोलीस अधीक्षक असतील.मुंबई शहर पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांची बदली त्याच पदावर औरंगाबादला करण्यात आली आहे. अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सुनील भारद्वाज यांची बदली अन्न व औषधी प्रशासन;मुंबई येथे सह आयुक्तपदी करण्यात आली आहे.ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम हे मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून बदलून आले आहेत. हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय सुरगौडा-पाटील हे आता ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक असतील. महाराष्ट्रपोलीस अकादमी; नाशिक येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक लताफड या गुन्हे अन्वेषण विभाग; औरंगाबादच्या नव्या पोलीसअधीक्षक असतील. राज्य गुप्तवार्ता विभाग; मुंबई येथील उपायुक्त डी.के.साकोरे हे आता गुन्हे अन्वेषण विभाग; पुणेचे पोलीस अधीक्षक असतील.वाशिमच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांची बदली पुणे शहर येथे उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे.गुन्हे अन्वेषण विभाग; नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक पंकजडहाणे यांची बदली नवी मुंबईतच पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे. राज्य सुरक्षा महामंडळाचेपोलीस अधीक्षक विश्वास पांढरे हे धुळे येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदलून जात आहेत. या आधी धुळ्याच्या पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंडे यांची बदली करण्यात आली होती मात्र आता ती स्थगित करण्यात आली आहे.

टॅग्स :पोलिसबदली