Join us

मुंबईत कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 19:52 IST

गोरेगाव येथील नाल्यात पडून एक बालक बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू घडल्याची घटना मुंबईत घडली आहे.

मुंबई - गोरेगाव येथील नाल्यात पडून एक बालक बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू घडल्याची घटना मुंबईत घडली आहे. हा मुलगा वरळी सी लिंकजवळ कोस्ट रोडच्या बांघकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडाला होता. कोस्टल रोडच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर खड्डे खोदण्यात आले असून, वरळी सी लिंकजवळ खोदलेल्या अशाच एका खड्ड्यात आज एक 12 वर्षीय मुलगा पडला. पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या खड्ड्यात हा मुलगा बुडाला. दरम्यान, त्याला खड्ड्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  

 

टॅग्स :मुंबईअपघात