‘उत्पादन शुल्क’ने ६ महिन्यांत कमावले १२,३३२ कोटी; महसुलात गतवर्षापेक्षा ११.९ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 09:31 IST2025-10-21T09:31:25+5:302025-10-21T09:31:38+5:30
सर्वाधिक ३,०९८ महसूल नाशिक विभागातून मिळाला आहे. तर, अमरावती विभागाला सर्वांत कमी ८१ कोटींचा महसूल मिळाला.

‘उत्पादन शुल्क’ने ६ महिन्यांत कमावले १२,३३२ कोटी; महसुलात गतवर्षापेक्षा ११.९ टक्क्यांनी वाढ
खलील गिरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाला एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १२ हजार ३३२ कोटी ६२ लाखांचा महसूल मिळाला. २०२४ च्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीपेक्षा त्यात ११.०९ % वाढ झाली. गतवर्षी ११ हजार १०१ कोटी ३ लाखांचा महसूल मिळाला होता. उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर, अमरावती या विभागीय कार्यालयांद्वारे जिल्ह्यांतील कामकाजावर लक्ष ठेवले जाते.
सर्वाधिक ३,०९८ महसूल नाशिक विभागातून मिळाला आहे. तर, अमरावती विभागाला सर्वांत कमी ८१ कोटींचा महसूल मिळाला. मुंबई शहर जिल्ह्यातील महसुलातही घट झाली आहे. गतवर्षी २९ कोटी ४७ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यात घट होऊन यंदा २८ कोटी ८० लाख झाला आहे. ही घट २.२९ टक्के एवढी आहे.
जिल्ह्यांत विभागांनुसार जमा झालेली रक्कम
नाशिक ३०९८ कोटी ११ लाख
छ.संभाजीनगर ३०११ कोटी ५८ लाख
पुणे १४२१ कोटी २७ लाख
अहिल्यानगर १२१५ कोटी २८ लाख
मुंबई उपनगर १२९ कोटी ६६ लाख
ठाणे १७५ कोटी ८० लाख
पालघर ८५६ कोटी २१ लाख
रायगड ८०२ कोटी ७७ लाख