Join us  

मुंबईतील मरोळ येथे बेस्ट बसला अपघात, 10 प्रवासी जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 3:55 PM

मुंबईतील अंधेरीजवळील मरोळ येथे बेस्ट बस आणि डंपर यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये 10 प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबई - मुंबईतील अंधेरीजवळील मरोळ येथे बेस्ट बस आणि डंपर यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये 15 जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मरोळ आगाराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघातग्रस्त बस ऐरोलीवरून अंधेरीकडे येत असताना मरोळ आगाराजवळ एक डंपर अचानक गल्लीतून थेट मेन रोडवर आल्याने बसची धडक डम्परला बसली. आज दुपारी पावणे एकच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर ही बस जाऊन डंपरवर घडकली. या अपघातामुळे बसचे मोठे नुकसान झाले. तसेच बसमधून प्रवास करत असलेल्या ड्रायव्हर आणि वाहकासह  13 प्रवाशांना दुखापत झाली आहे. जखमी प्रवाशांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :बेस्टमुंबईअपघात