मुंबई : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची पहिली सामाईक गुणवत्ता यादी बुधवार, २१ जून रोजी जाहीर केली जाणार असून, यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना २४ जूनपर्यंत त्या त्या महाविद्यालयांत प्रवेश घेता येईल. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीच्या माहितीनुसार १४ जूनपासून इनहाऊस कोटा व अल्पसंख्याक संवर्गाचे प्रवेश सुरू झाले. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेत मुंबई परिमंडळातून २ लाख ६७ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर २ लाख ४० हजार ४९ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक करण्यात आले आहेत. याखेरीस, १ लाख ३३ हजार २७२ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, ३२ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.
अकरावी प्रवेशाची पहिली यादी २१ जूनला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 06:09 IST