११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 09:45 IST2026-04-06T09:43:06+5:302026-04-06T09:45:04+5:30

१४ लोकल खोळंबल्या

115-year-old Elphinstone Bridge finally makes history; Block extended by one and a half hours due to Maharail delay | ११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला

११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील परळ-प्रभादेवी परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे पुलाचे पाडकाम रविवारी पूर्ण करण्यात आले. हे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) ने मध्य रेल्वे भागातले ३७ मीटर लांबीचे पॅनल काढून हे काम पूर्ण केले. दरम्यान पाडकाम करण्यासाठी महारेलकडून विलंब झाल्याने ब्लॉक दीड तास लांबल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. याचा परिणाम रेल्वेसेवांवर झाला असून, सकाळी १४ लोकल खोळंबल्याचे ते म्हणाले.

प्रभादेवी पूल १९११ साली उभारण्यात आला होता. शिवडी वरळी उन्नत पुलाचा भाग असणारा नवीन दुमजली पूल रेल्वे भागातून जात होता. त्यासाठी  सुमारे ११५ वर्षे जुना पूल पडणे आवश्यक होते. 

पाडकामासाठी घेतले २० ब्लॉक 

संपूर्ण प्रभादेवी पूल हटविण्यासाठी एकूण २० कॉरिडॉर ब्लॉक्स घेतले. सुरुवातीला  पश्चिम रेल्वे भागातील ४ पॅनल्स काढण्यात आले. मध्य रेल्वे भागातील काम कारण्यासाठी ६ मोठे ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेण्यात आले. पहिल्या पाच दिवसांत दररोज चार तासांचे ब्लॉक्स घेऊन एकेक पॅनेल काढले. त्यानंतर दि. ४ व दि. ५ एप्रिल रोजी घेतलेल्या मेगा ब्लॉकमध्ये ३७ मीटर लांबीचे आणि प्रत्येकी २५ टन वजनाचे दोन मुख्य गर्डर्स हटविले.

पॅनेल्स व गर्डर हटविण्यास यंत्रसामग्री

  • ५०० ते ८०० टन क्षमतेच्या ३ क्रेन्स 
  • हायड्रा मशीन
  • ४ टॉवर वॅगन्स
  • ६० कंत्राटी कामगार
  • ९५ ओव्हरहेड वायर कर्मचारी


पाडकामात अडचणी

  • परिसरातील उंच इमारतींमुळे क्रेन उभारण्यात अडथळे
  • अरुंद जागा
  • गंजलेले बेअरिंग्स 
  • जुन्या संरचनेची अनिश्चित स्थिती


‘ब्लॉक बस्टर’ ठरला त्रासदायक

शनिवारी रात्री ११.४५ ते रविवारी पहाटे ५.४५ असा सहा तासांचा ब्लॉक नियोजित होता. मात्र, गंजलेले व धुळीने भरलेले बेअरिंग्स कापताना मोठा अडथळा निर्माण झाला. महत्त्वाच्या ठिकाणी कापणी करताना सुमारे १ तास १५ मिनिटे अधिक वेळ लागला. याचा परिणाम रेल्वे सेवांवर झाला. अनेक मेल/एक्स्प्रेस विलंबाने धावल्या, तर रविवारी संपूर्ण वेळापत्रक बिघडले.

सुरुवातीला आम्ही १२ तासांचा ब्लॉक मागितला होता. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ब्लॉक ६ तासांवर आणला. काम अत्यंत आव्हानात्मक असल्याने थोडा विलंब झाला, तरी एकूण कालावधी अर्ध्यावर आणण्यात यश आले होते. आता पुनर्बांधणीचे काम लवकरच सुरु करू.
-राजेश कुमार जैस्वाल, व्यवस्थापकीय संचालक, महारेल

Web Title : 115 साल पुराना एल्फिन्स्टन पुल ध्वस्त; महारेल की देरी से रेल बाधित

Web Summary : मुंबई का 115 साल पुराना एल्फिन्स्टन पुल नए निर्माण के लिए ध्वस्त किया गया। महारेल की देरी से काम बाधित हुआ, जिससे रेल सेवाएं प्रभावित हुईं और ट्रेनें देरी से चलीं। पुल को हटाने के लिए व्यापक योजना, उपकरण और जनशक्ति की आवश्यकता थी।

Web Title : Elphinstone Bridge Demolished After 115 Years; Maharel Delay Disrupts Rail

Web Summary : Mumbai's 115-year-old Elphinstone bridge was demolished to make way for a new structure. A delay by Maharel extended the work block, impacting railway services and causing train delays. The demolition required extensive planning, equipment, and manpower, overcoming challenges like rusty bearings.