एकाच दिवशी निघाले ११५ जीआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:51 IST2019-03-08T04:55:58+5:302019-03-08T06:51:40+5:30

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने भूमीपूजन, उद्घाटन आणि घोषणांचा धडाका सुरू केला आहे.

115 grams left on the same day | एकाच दिवशी निघाले ११५ जीआर

एकाच दिवशी निघाले ११५ जीआर

मुंबई : कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने भूमीपूजन, उद्घाटन आणि घोषणांचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गुरूवारी एकाच दिवशी विविध विभागांकडून तब्बल ११५ जीआर जारी करण्यात आले.
राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी सुमारे दोन डझन निर्णय घेतले. मंत्रीमंडळाच्या निर्णयाप्रमाणेच शासन निर्णयांचाही (जीआर) सध्या धडाका सुरू
आहे. मागील आठवडाभरात एकूण ५३३ जीआर निर्गमित करण्यात
आले असून येत्या एक-दोन दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: 115 grams left on the same day