Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे ११ प्रभाग समिती अध्यक्ष बिनविरोध..! ८ ठिकाणी भाजप, उद्धवसेना २, तर एका ठिकाणी शिंदेसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 07:06 IST

सहा प्रभागांची ५, ६ आणि ९ तारखेला निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेच्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी ११ प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकच अर्ज आल्यामुळे या समितीच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड होणार आहे. यामध्ये ८ ठिकाणी भाजप, २ ठिकाणी उद्धवसेना तर एका ठिकाणी शिंदेसेनेच्या नगरसेवकांची प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली आहे. उर्वरित सहा प्रभाग समितीची निवडणूक ५, ६ व ९ मार्चला घेण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये वाढ झाल्यामुळे १६ प्रभाग समितीमध्ये एकने वाढ होऊन १७ प्रभाग समिती झाल्या आहेत. पूर्वी के-पूर्व म्हणून ओळखली जाणारी प्रभाग समिती आता के-दक्षिण व के-उत्तर प्रभाग समिती म्हणून ओळखली जाणार आहे. मालाड पी-उत्तर प्रभाग समितीलाही यापुढे पी-उत्तर व पी-पूर्व प्रभाग समिती म्हणून ओळखले जाणार आहे. 

प्रभाग समितीसाठी बुधवार, ४ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सायंकाळी सहा वाजेपर्यंत शेवटची वेळ होती. मुंबईतील १७ प्रभाग समित्यांसाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण २५ अर्ज दाखल झाले. एम पूर्व विभागात एमआयएमच्या नगरसेवकांचे संख्याबळ अधिक असल्याने पहिल्यांदाच एमआयएमचा प्रभाग समिती अध्यक्ष बनणार आहे.

दादरमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरेदादर जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे उमेदवार जोसेफ कोळी यांच्या विरोधात मनसेने यशवंत किल्लेदार यांना रिंगणात उतरवले आहे. 

येथे होणार निवडणूकए, बी, ई : ज्ञानराज निकम, काँग्रेस वि. रोहिदास लोखंडे, भाजपएफ दक्षिण, एफ उत्तर :  मानसी सातमकर, शिंदेसेना वि. श्रद्धा जाधव, उद्धवसेना जी उत्तर : जोसेफ कोळी, उद्धवसेना : यशवंत किल्लेदार, मनसेपी उत्तर-पूर्व : अजित रावराणे, राष्ट्रवादी (शरद पवार) वि. हैदरअली असलम शेख, काँग्रेसएम पूर्व : खैरनुसा हुसेन, एमआयएम वि. प्रज्ञा सदाफुले, शिंदेसेनाएस आणि टी : साक्षी दळवी, भाजप वि. सुरेश शिंदे, उद्धवसेना

एस, टी प्रभाग समितीचा अध्यक्ष चिठ्ठी ठरवणारभांडुप एस व मुलुंड टी प्रभाग समिती भाजपाशिवसेना महायुतीचे १० व शिवसेना ठाकरे गट काँग्रेस, मनसे आघाडी यांचे १० असे समसमान नगरसेवक असल्यामुळे येथे दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडणार आहेत. त्यामुळे चिठ्ठी उडवून अध्यक्ष कोण होणार, हे ठरणार आहे. दरम्यान ए,बी,ई या प्रभाग समिती शिवसेना ठाकरे, काँग्रेसचे ६ नगरसेवक असून भाजप शिवसेनेचे ५ नगरसेवक आहेत. तर सपचा एक नगरसेवक आहे. सपने महायुतीला मदत केल्यास येथेही समसमान मते पडणार आहे, त्यामुळे अध्यक्ष चिठ्ठी उडवून ठरवावा लागणार आहे. तर सपने पाठिंबा न दिल्यास काँग्रेसचा विजय निश्चित आहे.

या प्रभाग समितीत बिनविरोध अध्यक्षसी-डी - आकाश पुरोहित, भाजपके पश्चिम - रोहन राठोड, भाजपके-दक्षिण/उत्तर - प्रकाश मुसळे, भाजपपी-दक्षिण - श्रीकला पिल्ले, भाजपआर दक्षिण - लीना देहरकर, भाजपआर-मध्य/उत्तर - प्रकाश दरेकर, भाजपएम पश्चिम - आशा मराठे भाजपएन - अश्विनी मते, भाजपजी दक्षिण - पद्मजा चेंबूरकर, उद्धवसेना एच पूर्व/पश्चिम - रोहिणी कांबळे, उद्धवसेनाएल - विजेयंद्र शिंदे, शिंदेसेना 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Civic Body: 11 Ward Committee Chiefs Elected Unopposed

Web Summary : Eleven ward committee heads in Mumbai are elected unopposed, with BJP securing eight positions, Uddhav Sena two, and Shinde Sena one. Elections for the remaining six committees are scheduled for March 5, 6, and 9.
टॅग्स :भाजपामुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६शिवसेना