Join us
Daily Top 2Weekly Top 5

परेवरील 11 तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, दादर स्थानकामध्ये गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 01:28 IST

लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासाच्या मेगाब्लॉक मुळे प्रवाशाचे हाल होत आहेत. 

मुंबई : लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासाच्या मेगाब्लॉक मुळे प्रवाशाचे हाल होत आहेत.  2 फेब्रुवारीला रात्री 10 वाजल्यापासून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. डाऊन जलद लोकल दादर पासून सुरू आहेत. त्यामुळे दादर स्थानकावर प्रवाशांची गर्दी एकवटली आहे.  चर्चगेट ते प्रभादेवी या एकूण आठ स्थानकावरील गर्दी दादर वर जमली आहे. प्रवाशांची लोकल पकडण्यासाठी धावपळ सुरू आहे.

लोअर परळ स्थानकाजवळ असलेल्या आणि धोकादायक बनलेल्या पुलाचे गर्डर काढण्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी मोठ्या क्रेन आणण्यात आल्या असून, काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई लोकलदादर स्थानक