Join us

दहावी तर निघाली, अकरावी सायन्सला प्रवेश मिळेल का? प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेशासाठी लागली चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 12:49 IST

अकरावी प्रवेशाची पहिल्या टप्प्यात नोंदणी सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिल्या टप्प्यात नोंदणी सुरू झाली आहे. यंदा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने महाविद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चुरस लागली आहे.

यंदा जागांमध्ये वाढ 

वाणिज्य आणि विज्ञान शाखेत यंदा एक हजार जागांची वाढ झाली आहे. तर एकूण जागांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत २ हजार ५८० जागांची वाढ झाली आहे.

पूर्वी दिलेले पसंतीक्रम बदलता येणार 

- अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर महाविद्यालयांचा गेल्यावर्षीचा कटऑफ देण्यात आला आहे. - यात दहावीतील गुण, आरक्षण, शाखा, माध्यम, पत्ता ही माहिती भरून कोणत्या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी पात्र आहे याची माहिती घेता येणार आहे. - विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांच्या कमीअधिक प्रमाणात असलेली महाविद्यालयाची कटऑफ पाहून विद्यार्थ्यांनी कोणते महाविद्यालय निवडायचे याचा निर्णय घ्यायचा आहे. - दोन ते दहा पसंतीक्रम महाविद्यालयाला मिळाल्यास, आपला प्रवेश आपण घ्यायचा किंवा नाही हे ठरवू शकता. - असे विद्यार्थी पुढच्या प्रवेशफेरीसाठी पात्र ठरतात.

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

- नियमित पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे : ८ ते १२ जून - प्रवेश अर्ज भाग एक भरणे, मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करणे : १२ जून- तात्पुरती पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे : १३ जून- गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे : १३ ते १५ जून - पहिली गुणवत्ता यादी तयार करणे : १५ जून- पहिल्या गुणवत्ता यादीचा डेटा प्रोसेसिंग : १६ ते १८ जून -  पहिली गुणवत्ता यादी : १९ जून

 

टॅग्स :शिक्षण