१० हजार मतदार मूळ प्रभागात; इतर ठिकाणी गेलेल्या मतदारांची नावे पालिकेकडून मूळ ठिकाणी समाविष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:27 IST2025-12-25T10:26:50+5:302025-12-25T10:27:02+5:30
प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांवर निर्णय देण्यासाठी वॉर्ड सहायक आयुक्त यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१० हजार मतदार मूळ प्रभागात; इतर ठिकाणी गेलेल्या मतदारांची नावे पालिकेकडून मूळ ठिकाणी समाविष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागांत स्थलांतरित झालेल्या जवळपास १० हजार मतदारांना त्यांच्या मूळ प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रभाग प्रारूप मतदार यादीवर पालिकेला एकूण ११ हजार ४९७ हरकती व सूचना प्राप्त झाल्या. त्यातील स्थलांतरित मतदारांच्या हरकतींवर कार्यवाही करत पालिकेने याबाबत माहिती जाहीर केली आहे. यात सर्वाधिक ‘एम पूर्व’ (गोवंडी, मानखुर्द) परिसरातील विविध प्रभागांतून ३ हजार ५७९ मतदारांना मूळ प्रभागात समाविष्ट केले आहे.
प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांवर निर्णय देण्यासाठी वॉर्ड सहायक आयुक्त यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांत एकूण ११ हजार ४९७ हरकती आल्या. यापैकी १० हजार ६६८ हरकती व सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी निर्णय दिला.
तर उर्वरित ८२९ हरकती दुबार मतदारांबाबत आहेत. प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकती, सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयानुसार, अंतिम मतदार यादीच्या अनुषंगाने ‘कंट्रोल चार्ट’ तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
दरम्यान, हरकतींबाबतच्या कंट्रोल चार्टमध्ये ज्या प्रभागांतील स्थलांतरित मतदारांची संख्या १०० हून अधिक आहे, अशा सर्व प्रकरणांत गूगल मॅपमध्ये दाखविलेल्या प्रभागनिहाय हद्दीनुसार घर, इमारत, चाळ या सगळ्यांची पडताळणी करण्यात आली. तसेच खातरजमा करून याबाबत प्रमाणपत्र छायाचित्र सादर करण्यात आले असून, मतदारांचे नाव त्यांच्या मूळ प्रभागात समाविष्ट केले आहे.
वॉर्ड आणि मूळ प्रभागातील मतदारांची संख्या
एफ उत्तर ७२
के पूर्व - के उत्तर ३६३
एल २५८
आर उत्तर ११५२
आर मध्य ५९०
आर दक्षिण २१००
जी उत्तर २३६
जी दक्षिण १२
के पश्चिम ४३२
एल पूर्व ३५७९
पी पूर्व ९२०
टी ७४
नावे इतर प्रभागांत जाण्याची कारणे काय?
तपासणीतील चुकांमुळे अथवा कंट्रोल चार्ट अपलोड करताना झालेल्या चुकांमुळे फटका बसू शकतो. चाळ पुनर्विकासित
होऊन नवीन इमारत झाल्यामुळे हद्दीतील नजरचुकीने मतदार
इतर प्रभागात.