Join us  

दहा टक्के पाणीकपात झाली रद्द; तलावांमध्ये ५१ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 6:35 AM

तलावांमध्ये कमी जलसाठा असल्यामुळे गेल्या वर्षीपासून लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणीकपात शुक्रवारी रद्द करण्यात आली.

मुंबई : तलावांमध्ये कमी जलसाठा असल्यामुळे गेल्या वर्षीपासून लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणीकपात शुक्रवारी रद्द करण्यात आली. पावसाने गेले काही दिवस विश्रांती घेतली असून, तलावांमध्ये अद्याप ५० टक्के जलसाठा कमी आहे. मात्र, पाणीकपात मागे घेण्यासाठी पालिका प्रशासनावर राजकीय दबाव वाढत होता. अखेर १५ नोव्हेंबरपासून सुरू असलेली पाणीकपात रद्द केल्याचे स्थायी समितीची बैठकीत प्रशासनाने जाहीर केले.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९१ टक्केच जलसाठा असल्याने, १५ नोव्हेंबर, २०१८ पासून पाणीकपात लागू करण्यात आली. पावसाळा लांबणीवर पडल्यामुळे तलावांमध्ये पाण्याची पातळी खालावली. यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जून अखेरीस पावसाने जोर धरला. दररोज ५० ते ६० हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढू लागला. त्यामुळे तलावांमधील पाण्याच्या पातळीत झटपट वाढ होत राहिली. त्यामुळे पाणीकपात मागे घेण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून होत होती. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप तलावांमध्ये सात लाख ४३ हजार म्हणजे ५१ टक्के जलसाठा आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने पाणीकपात रद्द करणे मुंबईला महागात पडू शकेल, परंतु नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी पाणीकपात मागे घेण्याचे गुरुवारी पालिका प्रशासनाला निर्देश दिले. त्यानुसार, पाणीकपात रद्द करीत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.>जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)तलाव कमाल किमान आजची स्थितीमोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६०.३४तानसा १२८.६३ ११८.८७ १२७.०४विहार ८०.१२ ७३.९२ ७७.८५तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.१७अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ५९६.३५भातसा १४२.०७ १०४.९० १२६.१०मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २७५.२७>सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणारतलावांमध्ये ५० टक्केच जलसाठा आहे. अशा वेळी पाणीकपात मागे घेतल्यानंतर पाऊस न झाल्यास पालिकेचे नियोजन काय? असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. मात्र, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याचे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :धरणपाणीकपात