बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबई, नवी मुंबईत १० जेसीबींची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:42 AM2020-10-05T01:42:52+5:302020-10-05T01:43:22+5:30

अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा; गुन्हे शाखेने केली कारवाई

10 JCBs sold in Mumbai Navi Mumbai on the basis of forged documents | बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबई, नवी मुंबईत १० जेसीबींची विक्री

बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबई, नवी मुंबईत १० जेसीबींची विक्री

Next

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे १० जेसीबींची मुंबईत विक्री करणाऱ्या ठगांचा गुन्हे शाखेने भांडाफोड केला असून, अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई अमोल चंद्र्रकांत साळुंखे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याच इमारतीत राहणारे सुरेंद्र्रसिंग प्रेमसिंग वासन हे आरटीओ एजंट आहेत. २४ सप्टेबर रोजी वासन यांचा आरटीओ एजंट असलेला मित्र किरण जगदाळे याच्या ओळखीचा मित्र मोहम्मद आसाफ सावकार याने जुनी १० जेसीबी वाहने फेब्रुवारी, २०२०पूर्वी हरियाणा राज्यातून खरेदी करून ती मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील रहिवाशांना विक्री केली आहेत.

संबंधित जेसीबी वाहनांचे हरियाणा राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन हस्तांतरित करावयाचे नाहरकत प्रमाणपत्र, मूळ नोंदणी प्रमाणपत्र असे त्यांनी प्राप्त केली आहेत. हस्तांतरित नाहरकत प्रमाणपत्र, मूळ नोंदणी प्रमाणपत्र यावरून सदर जेसीबी वाहने खरेदी करणाºया मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील रहिवाशांच्या नावे प्रादेशिक परिवहन विभाग, नागपूर येथून करून देण्यास मदत करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पुढाकार घेत होकार दिला. ठरल्याप्रमाणे कागदपत्रे ताब्यात घेतली. मात्र कागदपत्र पडताळणीदरम्यान संशय आला.

गुडगाव, रेवरी, परिवहन कार्यालयाचा बनावट शिक्का
गुन्हे शाखेने याबाबत केलेल्या चौकशीत मोहम्मद आसाफ सावकार व इतरांनी स्वत:च्या फायद्याकरिता संगनमत करून रुपये १ कोटी किमतीची एकूण १० जेसीबी वाहने चोरी अथवा फसवणूक करून मिळवली.

हरियाणा राज्यातील गुडगाव, रेवरी, पालवाल व मेवाट येथील प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाची बनावट सही- शिक्का असलेली वाहने हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्र, मूळ नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून, ते खरे असल्याचे भासवण्यात आले़

Web Title: 10 JCBs sold in Mumbai Navi Mumbai on the basis of forged documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.