Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई : अंधेरीतील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये अग्नितांडव, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 09:05 IST

अंधेरीतील मरोळ परिसरातील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इंडिया वन प्रिंटींग प्रेसला बुधवारी ( 15 फेब्रुवारी ) रात्री आग लागल्याची घटना घडली आहे.

मुंबई - अंधेरीतील मरोळ परिसरातील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इंडिया वन प्रिंटींग प्रेसला बुधवारी ( 15 फेब्रुवारी ) रात्री आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्रदीप विश्वकर्मा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आग लागल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाला. त्यात प्रिटींग प्रेसच्या आजूबाजूस जाग नसल्यानं लोकांना बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली. यातच प्रदीप विश्वकर्मा आत अडकून पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

फायर ब्रिगेडच्या 5 गाड्या आणि 5 पाण्याच्या टँकरच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. 

 

टॅग्स :आगमुंबई