शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

किरकोळ वाद हाणामारीवर पोहोचून नंतर एका गटाने केला दुसऱ्यावर सुरीहल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:16 PM

दक्षिण गोव्यात असलेल्या वास्को रेल्वे स्थानकाच्या बाहेर खाण्याच्या गाड्यावर दोन गटात निर्माण झालेला किरकोळ वाद हाणामारीवर पोचल्यानंतर एका गटाने दुस-या गटातील दोघाजणांवर सु-याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.

वास्को -  दक्षिण गोव्यात असलेल्या वास्को रेल्वे स्थानकाच्या बाहेर खाण्याच्या गाड्यावर दोन गटात निर्माण झालेला किरकोळ वाद हाणामारीवर पोचल्यानंतर एका गटाने दुस-या गटातील दोघाजणांवर सु-याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. जुआरीनगर, कुठ्ठाळी येथे राहणाºया २५ वर्षीय प्रणव भराडे व २४ वर्षीय मुलायमसिंग यादव यांच्यावर दुसºया गटाने सु-याने हल्ला केल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत. प्रणव व मुलायम यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणात चार संशयित असून यापैंकी प्रमोद तोरस्कर (वय ३३, रा: सडा - मुरगाव) याला वास्को पोलीसांनी अटक केली असून त्या तिघांचा शोध चालू आहे.वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी (दि.२९) मध्यरात्री २.३० च्या सुमारास सदर घटना घडली. सडा, मुरगाव भागात राहणारे प्रमोद तोरस्कर, पंकज नाईक, प्रकाश कांबळी व योगेश पाटील नावाचे चार तरुण मध्यरात्री वास्को रेल्वेस्थानका बाहेर असलेल्या एका गाड्यावर खाण्यासाठी गेले होते. ह्याच गाड्यावर झरींत, जुआरीनगर भागात राहणारे प्रणव भराडे व मुलायमसिंग यादव असे अन्य दोन तरुण खाण्यासाठी आले होते. ‘आम्ही येथे पूर्वी आलो असून त्यांना पूर्वी खाण्यास दिल्याने’ अशा किरकोळ विषयावरून ह्या दोन्ही गटात पूर्वी वाद सुरू झाला. यानंतर हे प्रकरण जास्तीवर पडून नंतर प्रमोद, पंकज, प्रकाश व योगेश यांनी प्रणव व मुलायम यांना शिवीगाळ करण्यास सुरवात करून त्यांची मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी प्रणव याच्या पोटावर तसेच मुलायम याच्या हातावर सुºयाने हल्ला करण्यात आल्याने त्यांना गंभीर जखमा झाल्याअसून नंतर त्यांना उपचारासाठी गोमॅकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले.सुरी हल्ल्यामुळे प्रणव याच्या पोटावर तर मुलायम याच्या हातावर गंभीर जखमा झालेल्या असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक डायगो ग्राशियस यांनी दिली. सदर प्रकरणाची माहीती पोलीसांना मिळताच त्यांनी मारहाण व सुरा हल्ला केल्या प्रकरणात प्रमोद, पंकज, प्रकाश व योगेश याच्याविरुद्ध भादस ५०४, ५०६, ३२४(२) आरडब्ल्यु ३४ कलमाखाली गुन्हा नोंद केला. मारहाण करून गायब झालेल्या ह्या प्रकरणातील प्रमोद यास गुरूवारी (दि.२९) संध्याकाळी पोलीसांनी गजाआड करून अटक केली असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक डायगो ग्राशियस यांनी दिली. त्या चार जणापैंकी प्रणव व मुलायम याच्यावर नेमका सुरा हल्ला कोणी केला आहे हे अजून स्पष्ट झालेले नसून पोलीस याबाबत तपास करीत असलेतरी प्रकाश कांबळी यांनी सुरा हल्ला केला असल्याचा संशय सध्या पोलीसात निर्माण झाला आहे. दरम्यान सदर प्रकरणातील गायब असलेल्या अन्य तीन संशयितांचा वास्को पोलीस शोध घेत आहेत.वास्को रेल्वे स्थानकाच्या बाहेर लावण्यात येणाºया खाण्याचे गाडे उशिरा मध्यरात्री पर्यंत चालत असून अनेक वेळा भांडणे अथवा विविध वादाचे विषय निर्माण होत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्याचे दिसून आल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. मध्यरात्री एका गटाने दुसºया गटावर सुरी हल्ला केलेल्या प्रकरणानंतर वास्को पोलीस रात्री ११ नंतर येथे लावण्यात येत असलेले गाडे बंद करणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी