शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

Goa Election 2022: काँग्रेसकडून ११ उमेदवार घोषित; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध धर्मेश सगलानींना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 9:32 AM

Goa Election 2022: उमेदवारी देण्याच्या बाबतीत तरी काँग्रेसने भाजपला मागे टाकत आणखी ११ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : उमेदवारी देण्याच्या बाबतीत तरी काँग्रेसने भाजपला मागे टाकले आहे. काँग्रेसने आणखी ११ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. साखळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध धर्मेश सगलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नुवेंत माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा तर मुख्यमत्र्यांच्या मतदारसंघात धर्मेश सगलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पर्वरीत रोहन खंवटे यांच्या विरोधात विकास प्रभुदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे, थिवीत अमन लोटलीकर, सांत आंद्रेत अँन्थनी फर्नांडिस, वेळीत सावियो डिसिल्वा तर काणकोणमध्ये जनार्दन भंडारी या नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. अपेक्षेनुसार कळंगुट मतदारसंघात मायकल लोबो, मडकईत लवू मामलेदार, सांगेतून प्रसाद गांवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ९ उमेदवारांत पाच चेहरे नवीन आहेत. मुख्यमत्र्यांच्या मतदारसंघात धर्मेश सगलानी  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पर्वरीत रोहन खंवटे यांच्याविरोधात विकास प्रभुदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे, थिवीत अमन लोटलीकर, सांत आंद्रेत अँथनी फर्नांडिस तर काणकोणमध्ये जनार्दन भंडारी या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अपेक्षेनुसार कळंगुट मतदारसंघात  मायकल लोबो, मडकईत लवू मामलेदार, सांगेतून प्रसाद गांवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

काणकोणात तिरकी चाल

काणकोण मतदरसंघात  उमेदवारीच्या शर्यतीत होते ते महादेव देसाई आणि चेतन देसाई; परंतु यांच्यापैकी कुणा एकाला उमेदवारी दिल्यास बंडखोरीचे स्पष्ट संकेत दिसत होते. त्यामुळे एक अनपेक्षित निर्णय घेताना जनार्दन भंडारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भंडारी हे काँग्रेसचे निष्ठावान नेते असून उमेदवारीसाठी त्यांनी कधीच दावा केला नव्हता. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस