शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

अडीच महिन्यातच गोव्यात मान्सूनची लक्ष्यपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 5:41 PM

सरासरी ११७ इंच पार, अनेक दशकांचा विक्रम

पणजी: नैऋत्य मान्सून गोव्याला सरासरी ११६ इंच एवढा पाऊस देतो, आणि हे लक्ष्य साधारणत: सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होत असते. यंदाच्या मान्सूनने अवघ्या अडीच महिन्यातच गोव्याचा कोटा गोव्याला बहाल करताना राज्यात ११७ इंचांहून अधिक पाऊस पाडला. 

गोव्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सरासरी ११६ इंच पाऊस पडतो. ऑगस्टच्या पूर्वार्धापर्यंत पावसाचे सामान्य प्रमाण आहे ९५ इंच एवढे. हे सर्व प्रमाण व अंदाज फोल ठरविणारा पाऊस यंदा गोव्याला मिळाला आहे. यंदा १५ ऑगस्टपर्यंत २१ टक्के अधिक पाऊस पडून ११७ इंच एवढा सरासरी पाऊस नोंद झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत इंचांचे दीड शतकही पूर्ण झाले तर ते आश्चर्य ठरणार नाही. कारण गोव्याच्या सत्तरी तालुक्यात पावसाने इंचांचे दीडशतक केव्हाच पूर्ण केले आहे तर सांगे तालुकाही त्याच मार्गावर आहे.

मान्सून गोव्यात १६ दिवस उशिरा दाखल होवूनही राज्याला भरपूर पाऊस दिला. जून महिन्यात ३० इंच, जुलैमध्ये ५१ इंच तर ऑगस्टच्या अर्ध्या महिन्यातच ३५ इंच एवढा पाऊस झाला आहे, तर अर्धा महिना अजून बाकी आहे. 

्रुंगोव्यात २३ जुन रोजी मान्सून दाखल झाल्यापासून पाऊस पडला नाही असा एकही दिवस गेला नाही. १५ ऑगस्टपर्यंतच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजे ६ इंच पाऊस पडला तर १८ जुलै पर्यंतच्या २४ तासात सर्वात कमी म्हणजे ५ मिलिमीटर एवढा पाऊस पडला.  गोव्यात सरासरी पावसाचे लक्ष्य कधी कधी ओलांडलेही जाते तर कधी कधी तुटीचा मान्सूनही मिळतो. परंतु अडीच महिन्यात लक्ष्य ओलांडण्याची घटना अनेक वर्षांतून पहिल्यांदाच घडत आहे. नेमके किती वर्षांचा विक्रम याची माहिती  हवामान खात्यालाही मागील नोंदी तपासून पाहाव्या लागतील अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. 

२४ तासात सर्वाधिक पाऊस पडलेले दिवस२९ जून    ४.३ इंच०३ जुलै    ४.७ इंच०५ ऑगस्ट    ५.५ इंच१५ ऑगस्ट    ५.७ इंच

टॅग्स :Rainपाऊस