शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Goa Assembly Election Result 2022: निवडणुकीत चांगली लढत दिल्यानंतरही पराभव, पुन्हा भाजपात जाणार? उत्पल पर्रिकरांनी स्पष्टच सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 6:22 PM

Utpal Parrikar News: भाजपाने पणजीतून उमेदवारी नाकारल्यावर भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्पल पर्रिकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच पुन्हा भाजपात जाणार का? या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर दिले आहे.

पणजी - भाजपाने पणजीतून उमेदवारी नाकारल्यावर भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. भाजपाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उत्पल पर्रिकर यांना भाजपाचे अधिकृत उमेदवार बाबुश मोन्सेरात यांना कडवी टक्कर दिली. त्यात त्यांचा पराभव झाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्पल पर्रिकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच पुन्हा भाजपात जाणार का? या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर दिले आहे.

उत्पल पर्रिकर म्हणाले की, पणजीमध्ये माझ्या विचारांनी जी मतं मिळवण्यात मी यशस्वी झालो. तीच मतं माझ्यासोबत आहेत. जर केवळ चिन्हाचा विचार केला तर तुम्ही मी कुठे असतो हा विचार करा. पणजीत सगळ्यांनी जेवढा पाठिंबा दिला. जवळपास जिंकणाऱ्या उमेदवाराएववढाच पाठिंबा मला मिळाला.  त्यामुळे पणजीचे विषय विधानसभेतच मांडायचे असतात असं कुणी सांगितलंय,  मी ते बाहेरही मांडू शकतो, असे उत्पल पर्रिकर म्हणाले.दरम्यान, माझ्यासाठी आमदार व्हायचं हा मुद्दा कधीच नव्हता. तसेच देवेंद्र फडणवीसांकडून मला जो पर्याय दिला गेला होता. तिथे भाजपा जिंकला नाही.

तर तिसऱ्या स्थानी राहिला, असाही मुद्दा उत्पल पर्रिकर यांनी इथे मांडला. ते पुढे म्हणाले की, फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे पक्ष आणि कौटुंबिक नातं आहे हे मी नाकारलेलं नाही. मात्र पुन्हा पक्षात जाणं हा तांत्रिक मुद्दा आहे. माझा भावनात्मक मुद्दा आणि बाकी सर्व तुम्हाला माहितच आहे. तो हळुहळू सुटेल. असे उत्पल पर्रिकर म्हणाले.

पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या उत्पल पर्रिकर यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. उत्पल पर्रिकर यांना ६ हजार ७१ मते मिळाली होती. तर भाजपा उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना ६ हजार ७८७ मते मिळाली होती. 

टॅग्स :Utpal Parrikarउत्पल पर्रिकरGoa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२BJPभाजपा