Join us
Daily Top 2Weekly Top 5

Congratulations! यामी गौतमने उरीच्या दिग्दर्शकासोबत केले लग्न, पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 18:41 IST

यामीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे.

ठळक मुद्देयामीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, आम्ही आमच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज लग्नबंधनात अडकलो.

अभिनेत्री यामी गौतम नुकतीच लग्नबंधनात अडकली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्यने काबूल एक्सप्रेस, हाल ए दिल यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे.

यामीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, आम्ही आमच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज लग्नबंधनात अडकलो. मैत्रीपासून सुरू झालेल्या  या प्रवासाला आज एक नवे वळण मिळाले. 

यामीने उरी द सर्जिकल स्ट्राईक या आदित्यने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. 

टॅग्स :यामी गौतम