Join us

यामी गौतमच्या लाडक्या लेकाला पाहिलंत का? पहिल्यांदाच शेअर केला मुलगा 'वेदविद'चा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 09:05 IST

दिग्दर्शक आदित्य धर आणि यामी गौतमच्या मुलाचा फोटो समोर आला आहे.

अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) काही महिन्यांपूर्वीच मुलाला जन्म दिला. दिग्दर्शक आदित्य धर आणि यामी गौतम आईबाबा झाले. त्यांच्या आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात झाली. आई झाल्यानंतर यामीचा पहिला वाढदिवस काल गुरुवारी (28 नोव्हेंबर)  साजरा झाला. यावेळी तिचा पती आदित्य धर याने खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. सोबत आदित्यने यामीचा मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 

यामीचा पती आदित्य धरने मुलगा  'वेदविद'चा पहिला फोटो शेअर केला आहे. वेदविदच्या जन्मानंतर या जोडप्याने पहिल्यांदाच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, या फोटोंमध्ये वेदविदचा चेहरा दिसत नाही. मात्र, त्याची एक झलक पाहून चाहते खूश झाले आहेत.

यामी गौतमने 10 मे 2024 रोजी मुलाला जन्म दिला होता. आता नुकतंच अभिनेत्री कामावर परतली असून तिने तिच्या आगामी प्रोजेक्टचे शूटिंगही सुरू केले आहे. यामीने 4 जून 2021 मध्ये  आदित्य धर याच्यासोबत लग्न केलं होतं. यामीचे लग्न चाहत्यांसाठी सरप्राईजपेक्षा कमी नव्हते.  यामी गौतम आता तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. अभिनेत्री पती आणि मुलासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. 

टॅग्स :यामी गौतम