Join us

यामीची स्वारी खूश

By admin | Updated: December 30, 2014 23:06 IST

बॉलीवूडची बबली गर्ल यामी गौतमने अलीकडेच पुलकित सम्राटसोबत ‘जुनूनियत’ या आगामी चित्रपटासाठी काश्मीरमध्ये एक रोमँटिक गाणे शूट केले.

बॉलीवूडची बबली गर्ल यामी गौतमने अलीकडेच पुलकित सम्राटसोबत ‘जुनूनियत’ या आगामी चित्रपटासाठी काश्मीरमध्ये एक रोमँटिक गाणे शूट केले. केशरी रंगाचे दिसणारे चिनारवृक्ष आणि निसर्गसौंदर्याने नटलेले काश्मीर यात दिसणार आहे. काश्मीरमध्ये असा मोसम वर्षातील केवळ १५ दिवसच असतो. याच दिवसांत तिकडे राहायला मिळाल्याने यामी भलतीच आनंदी आहे.