Join us

यामी बनणार वरुणची पत्नी

By admin | Updated: June 23, 2014 11:12 IST

नवोदित अभिनेत्री यामी गौतम ही वरुण धवणची पत्नी बनणार आहे. यामीच्या चाहत्यांनी यामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण यामी ही खर्‍या जीवनात नव्हे, तर चित्रपटात वरुणच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे

नवोदित अभिनेत्री यामी गौतम ही वरुण धवणची पत्नी बनणार आहे. यामीच्या चाहत्यांनी यामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण यामी ही खर्‍या जीवनात नव्हे, तर चित्रपटात वरुणच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. २0१२ यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘विक्की डोनर’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी यामी आता श्रीराम राघवनच्या ‘बदलापूर’ या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात हुमा कुरेशी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विनय पाठक यांच्या भूमिका आहेत.