Join us

शाहरुखसोबत काम करणार : सोनम

By admin | Updated: November 8, 2014 03:31 IST

सोनम कपूर सूरज बडजात्या यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात सलमान खानच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत बोलताना सोनम म्हणाली

सोनम कपूर सूरज बडजात्या यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात सलमान खानच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत बोलताना सोनम म्हणाली की, ‘मी सध्या एक स्वप्न जगत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. सलमान खूपच हँडसम असून तो एक चांगला व्यक्ती आहे. माझे पाय सध्या जमिनीवर नाहीत.’ आता सोनमला शाहरुखसोबत काम करण्याची संधीही मिळाली आहे. ‘रईस’ या चित्रपटात सोनमला शाहरुखच्या नायिकेच्या भूमिकेत कास्ट करण्यात आल्याची बातमी आहे. राहुल ढोलकिया यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात शाहरुख एका माफिया गँगच्या प्रमुखाच्या भूमिकेत आहे.