क तरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातम्या दोन आठवड्यांपूर्वी ऐकायला मिळाल्या. तसे त्याबाबतीत रणबीर आणि कतरिनाने सार्वजनिक काहीच सांगितले नाही. मात्र एका मुलाखतीत कतरिनाने रणबीरशी संबंधित आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. कतरिनाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ती सिंगल आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो क ी, तिचा रणबीरशी ब्रेकअप झाला असेल. मात्र आताच्या मुलाखतीत कतरिनाने सांगितले की, ‘रणबीरशी बे्रकअप नाही झाला. कोणी सांगितले की, माझा रणबीरशी ब्रेकअप झाला आहे. जर माझे रणबीरशी कोणतेच नाते नाही, तर बे्रक अपचा प्रश्नच नाही.’ जेव्हा कतरिनाला विचारले की, ‘रणबीरपासून का वेगळी झाली? तर तिने सांगितले की, बघा हा प्रश्नच चुकीचा आहे. मी कधी रणबीरसोबत कधी कोणत्या नातेसंबंधातच नव्हती. कोणी सांगितले की, माझे आणि रणबीरचे नाते होते? कतरिनाला पाहिजे ते सांगू द्या, मात्र बातम्यांनुसार ती रणबीरसोबत नात्यातच नाही, तर लिव्ह इनमध्येदेखील होती. काही दिवसांपूर्वीच दोघेही वेगवेगळे राहू लागले. या दिवसात कतरिना आपला आगामी चित्रपट ‘फितूर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
कुणी म्हटलं, माझा ब्रेकअप झाला?
By admin | Updated: February 7, 2016 09:06 IST