Join us

पाचशे-हजाराच्या नोटा बंद होताच लोकांना आठवली ‘कॅट’!

By admin | Updated: November 11, 2016 02:23 IST

५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाने बॉलिवूडही ढवळून निघाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनी या मुद्यावर वेगवेगळी मते नोंदवली.

५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाने बॉलिवूडही ढवळून निघाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनी या मुद्यावर वेगवेगळी मते नोंदवली. पण, बॉलिवूडची एक सेलिब्रिटी या निर्णयानंतर अचानक ट्रेंडमध्ये आली. ही सेलिब्रिटी म्हणजे कॅटरिना कैफ. होय, कॅटरिना आणि ‘चिकनी चमेली... ’ हे तिचे आयटम साँग नुकतेच सर्वाधिक सर्च केले गेले. होय, ‘मैं बारिश कर दूं पैसे की गर तू हो जाय मेरी’, असे कधीकाळी अक्षय कुमार कॅटरिना कैफला म्हणाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या आणि लोकांना अक्षयच्या गाण्यातील हीच कॅट आठवली. त्यामुळे तिला इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले गेले. ५०० व १००० च्या नोटा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाने खळबळ माजली. अचानक झालेल्या या घोषणेने लोकांना काळजीत टाकले. पण, त्याच वेळी या घोषणेनंतर सोशल मीडियावर जोक्सचा पूर आला. अशाच एका जोक्ससाठी कॅटरिनाचे ‘चिकनी चमेली... ’ हे गाणे इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले गेले. ‘अग्निपथ’मधील या गाण्यात ‘नोट हजारों का खुल्ला छुट्टा कराने आई...’अशी एक ओळ आहे. लोकांना नेमकी हीच ओळ आठवली आणि त्यांनी इंटरनेटवरून या गाण्याचे क्लिप काढून ते एकमेकांशी शेअर केले.