Join us  

सध्या काय करतेय 'देवमाणूस' फेम अभिनेत्री नेहा खान?, लंडनमधील फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:59 PM

Neha Khan : अभिनेत्री नेहा खान हिने इंस्टाग्रामवर लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत.

मराठमोळी अभिनेत्री नेहा खान(Neha Khan)ने 'शिकारी' चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर ती लोकप्रिय मालिका देवमाणूसमध्येही झळकली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनं आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे आणि त्यानंतर ती बरेच दिवस कोणत्या मालिकेत किंवा सिनेमात झळकली नव्हती. त्यामुळे तिच्या चाहत्यांना ती सध्या काय करतेय, असा प्रश्न पडला होता. दरम्यान नेहा खान सध्या लंडनमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करते आहे.

अभिनेत्री नेहा खान हिने इंस्टाग्रामवर लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. नेहाने तिचा आगामी चित्रपट कधी प्रेम कधी गोंधळच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कोण कलाकार आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. नेहाच्या आगामी चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

नेहा खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केले आहे. याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती. शिकारी चित्रपटानंतर ती 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. याव्यतिरिक्त ती झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये सहभागी झाली होती. त्यात तिने नृत्याची झलक दाखवली होती.

टॅग्स :नेहा खान