Join us  

स्टाइलला नसते कोणती व्याख्या - प्रार्थना बेहरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2016 3:20 AM

स्टाइलची अशी कोणतीही व्याख्या नसते असं मला वाटते. स्टाइल म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स शो करणे. तुम्ही कोणत्याही प्रकारेच कपडे घाला ते तुम्हाला आत्मविश्वासाने कॅरी करत

स्टाइलची अशी कोणतीही व्याख्या नसते असं मला वाटते. स्टाइल म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स शो करणे. तुम्ही कोणत्याही प्रकारेच कपडे घाला ते तुम्हाला आत्मविश्वासाने कॅरी करत आले पाहिजेत. जेव्हा तुम्ही एखादा नवीन ड्रेस घालता त्यावेळी अचानक चेहऱ्यावरही एक वेगळा कॉन्फिडन्स दिसतो. फॅशन म्हणजे जे काही तुम्ही घालाल ती तुमची फॅशन बनते. मुळात जेव्हा मी स्टायलिश राहण्याचा प्रयत्न करते तेव्हा मी कोणालाचा फॉलो करत नाही. माझी स्वत:ची स्टाइल कशी असेल याकडे मी लक्ष केंद्रित करते. कारण इतरांचे स्टाइल स्टेटमेंट फॉलो करण्यात काहीच मजा नाही. ती स्टाइल ही त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरनुसार असते. त्यामुळे मी इतरांना फॉलो करण्यापेक्षा स्वत:लाच फॉलो करते. माझी एक वेगळी चॉइस आहे. माझ्या पर्सनालिटीनुसार जे मी योग्यरितीने कॅरी करू शकते, तसेच ड्रेसिंग स्टाइल मी करते. मला दीपिका पादूकोण आणि सोनम कपूर यांच्या स्टाइल आवडतात. कारण त्यांची स्टाइल ही त्यांची क्रिएटीव्हीटी असते. त्यांचा फॅशन सेन्स हा खूप छान आहे. त्यांना कोणतेही, कशाही प्रकारचे कपडे द्या ते छान कॅरी करताना दिसतात. मुळात आपण फॅशन म्हटले की फक्त कपड्यांचा विचार करतो, फॅशनही फक्त कपड्यांमध्येच नसून तर ती कोणत्याही गोष्टीत असू शकते. ती सगळ्या गोष्टींमध्ये दिसते. कधी तुमचे शूज, बॅग, अ‍ॅक्सेसरीज वापरण्यातही एक फॅशन दडलेली असते. मी अशा बऱ्याच मुलींना बघते, ज्या उंचीने कमी असतात मात्र त्या लांब स्कर्ट घालताना दिसतात. जो त्यांना सूटच होत नसतो. लाँग स्कर्टमुळे त्यांची उंची अजून कमी वाटते. मी बाहेर कोणत्या कार्यक्रमाला जाते, त्यानुसारच ड्रेसिंग स्टाइल करते. सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर पारंपारिक पद्धतीचा छानसा कुर्ता, पंजाबी ड्रेस अशा प्रकारे घालणे मला आवडते. कोणते पुरस्कार सोहळे असतील तर मी थोडे वेस्टर्न आउटफिट घालते. कारण तिथला ट्रेंड वेगळ असतो. वेगवेगळ््या समारंभानुसारच मी कपडे घालण्याचा प्रयत्न करते. डाएट अथवा जिममध्ये तासन तास वर्कआउट करण्यापेक्षा मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सगळ्यानाच सांगेन की सुंदर दिसायचे असेल तर आॅलवेज बी हॅपी !