Join us

अमेयचे चाललेय तरी काय?

By admin | Updated: September 29, 2016 01:50 IST

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या माध्यमातून अमेय वाघ घराघरांत पोहोचला. त्याच्या कैवल्य व्यक्तिरेखेला लोकांनी पसंतीही दिली. यानंतर तो एका वेब सिरीजमध्ये दिसला

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या माध्यमातून अमेय वाघ घराघरांत पोहोचला. त्याच्या कैवल्य व्यक्तिरेखेला लोकांनी पसंतीही दिली. यानंतर तो एका वेब सिरीजमध्ये दिसला ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ असे त्याचे नाव होते. एवढ्या सगळ्या कामात बिझी असणारा अमेयला आता नेमकं काय झालंय हाच साऱ्यांना प्रश्न पडलाय. त्याचे झाले असे की त्याने नुकतेच सोशल मीडियावर एक हटके फोटो अपलोड केला आहे. या फोटोत अमेयने एकाच पायात बूट घातला असून, दुसरा बूट जवळ असलेल्या खिडकीला लटकवला आहे. या खिडकीला लटकवलेल्या बुटाकडे पाहून अमेय हसतोय. अमेयच्या मस्तीच्या मूडमधल्या या फोटोला चाहते प्रेक्षक काय प्रतिसाद देतात, ते आपल्याला कळेलच. मात्र अमेय जरा वेगळ्याच मूडमध्ये आहे हे मात्र नक्की.