Join us  

"शेरनी का लौटने का वक्त आ गया है...", सुश्मिता सेनच्या 'आर्या ३'ची रिलीज डेट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 9:55 AM

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा ओटीटीवर दिसणार आहे. अलीकडेच ती 'ताली' या वेब सिरीजमध्ये गौरी सावंतच्या भूमिकेत दिसली होती. आता ती लवकरच 'आर्य सीझन ३' मध्ये दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा ओटीटीवर दिसणार आहे. अलीकडेच ती 'ताली' या वेब सिरीजमध्ये गौरी सावंतच्या भूमिकेत दिसली होती. आता ती लवकरच 'आर्या सीझन ३' (Aarya 3) मध्ये दिसणार आहे. तिने तिसऱ्या सीझनची रिलीज डेट सांगितली आहे. यामध्ये ती पुन्हा एकदा सिंहीण बनून आपल्या शत्रूंवर हल्ला करताना दिसणार आहे. अभिनेत्रीने या वेब सीरिजचे मोशन पोस्टर देखील रिलीज केले आहे. हा पोस्टर पाहून चाहते आणखी उत्सुक झाले आहेत.

सुष्मिता सेनची बहुप्रतीक्षित वेब सिरीज 'आर्या सीझन ३' डिस्ने प्लस हॉटस्टारवर ३ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. अभिनेत्रीने रिलीज केलेल्या मोशन पोस्टरमध्ये सिंहाने पंजा मारल्यानंतरचे निशाण दिसत आहे. यासोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सिंहिणीच्या परतण्याची वेळ आली आहे.' चाहते खूप दिवसांपासून या थ्रिलर वेब सीरिजची वाट पाहत होते आणि या पोस्टरमुळे त्यांच्यात उत्सुकता वाढली आहे.

चाहत्यांची वाढली उत्सुकतासुश्मिताच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'अखेर प्रतीक्षा संपली. आर्या परत येत आहे. एकजण म्हणाला, 'आम्हीही सिंहिणीची वाट पाहतोय.' एक म्हणाला, 'गेल्या दोन सीझननंतर आता तिसरा सीझन, नोव्हेंबर महिना फार दूर नाही.' तिच्या 'ताली'मधील कामाचे कौतुक करताना एक युजर म्हणाला, 'काय अप्रतिम अभिनेत्री आहे. मी ताली पाहिली आणि मजा आली.'

'आर्या ३' मध्ये कोण-कोण असेल?'आर्या'चा पहिला सीझन २०२० मध्ये आला होता आणि तो सुपरहिट ठरला. नंतर दुसरा सीझन आला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता तिसरा सीझन लवकरच येणार आहे. यात सुष्मिता सेनशिवाय अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय मुलगी वीरती वाघानी आणि मुलगा वीर वजिरानी देखील आपली ताकद दाखवताना दिसणार आहेत. याशिवाय आणखी काही नवे चेहरे दिसणार आहेत.

टॅग्स :सुश्मिता सेन