Join us  

'सिक्रेट ऑफ गावस्कर'च्या पदरात यश; टीमने जल्लोषात केलं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 6:00 PM

Secrets of Gavaskar: काही दिवसांपूर्वीच 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही नवीकोरी वेबसीरिज तगड्या स्टारकास्टसह प्रदर्शित झाली.

सध्याच्या काळात बराचसा प्रेक्षकवर्ग ओटीटीकडे वळला आहे. यात उत्तम कथानक, क्राइम, रोमान्स अशा कितीतरी गोष्टींचा भरणार असलेल्या वेब सीरिजची ओटीटीवर चलती असल्याचं दिसून येतं. यातलीच एक सीरिज म्हणजे 'सिक्रेट ऑफ गावस्कर' (Secrets of Gavaskar). नुकतीच ही सीरिज प्रदर्शित झाली असून अल्पावधीत ती लोकप्रिय झाली. त्यामुळेच या सीरिजच्या संपूर्णने टीमने दणक्यात सक्सेस पार्टीचं सेलिब्रेशन केलं.

काही दिवसांपूर्वीच 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही नवीकोरी वेबसीरिज तगड्या स्टारकास्टसह प्रदर्शित झाली. तेजस लोखंडे दिग्दर्शित ही सीरिज  'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. विशेष म्हणजे या सीरिजवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केल्यामुळे संपूर्ण टीमने धुमधडाक्यात सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशन पार्टीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, या सीरिजमध्ये अभिनेता हरीश दुधाडे, संग्राम समेळ, मयूर पवार, रमेश चांदणे, अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, दीप्ती लेले, शिल्पा नवलकर, मीरा सारंग, सीमा कुलकर्णी, लतिका सावंत, राधा धरणे ही तगडी स्टारकास्ट झळकली आहे.  

टॅग्स :वेबसीरिजसेलिब्रिटीसंग्राम साळवी