Join us  

तब्बल १४ वर्षांनंतर करण वाही आणि जेनिफर विंगेट आले एकत्र, म्‍हणाले- "हा नॉस्‍टॅल्जिक क्षण आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 9:32 PM

Karan Wahi And Jennifer Winget : आपण छोट्या पडद्यावर करण वाही व जेनिफर विंगेट यांचा रोमांस पाहिला आहे, पण १४ वर्षांच्‍या प्रदीर्घ काळानंतर ते पुन्‍हा एकत्र येण्‍याच्‍या वृत्ताने चाहत्‍यांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 'रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी' या सीरिजमध्ये दिसणार आहेत.

आपण सर्वांनी छोट्या पडद्यावर करण वाही (Karan Wahi) व जेनिफर विंगेट (Jennifer Winget) यांचा रोमांस पाहिला आहे, पण १४ वर्षांच्‍या प्रदीर्घ काळानंतर ते पुन्‍हा एकत्र येण्‍याच्‍या वृत्ताने चाहत्‍यांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 'रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी' या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सिरीज त्‍यांच्‍या पात्रांच्‍या गुंतागूंतींना आणि त्‍यांच्‍यामधील सर्वोत्तम केमिस्‍ट्रीला दाखवते. हे त्‍यांना एकत्र आणण्‍यासह पडद्यावरील त्‍यांच्‍या केमिस्‍ट्रीला अधिक दृढ करते, ज्‍यामधून प्रेक्षकांना नवीन व सर्वोत्तम मनोरंजनाची खात्री मिळते. 

 जवळपास दशकभरानंतर पुन्‍हा एकत्र येण्‍याबाबत करण वाही म्‍हणाले, ''१४ वर्षांनंतर जेनीसोबत पडद्यावर काम करण्‍याचा क्षण आमच्‍यासाठी, तसेच आमच्‍या चाहत्‍यांसाठी नॉस्‍टॅल्जिक आहे. पण यावेळी आमच्‍यामधील केमिस्‍ट्री, तसेच आमच्‍या भूमिका बदलल्‍या आहेत. रोमँटिकच्‍या तुलनेत प्रेक्षकांना आमच्‍यामधील शत्रुत्व, विमोचन आणि उत्कटता पाहायला मिळेल, ज्‍यामुळे प्रेक्षक सिरीजकडे अधिक आकर्षित होतील. आमच्‍या भूमिकांमध्‍ये अनेक भावना व गुंतागूंती सामावलेल्‍या आहेत, ज्‍यामुळे प्रत्‍येक सीनमध्‍ये उत्‍कटता व उत्‍सुकता आहे. हे फक्‍त एकत्र येणे नसून पडद्यावरील आमच्‍या डायनॅमिक्‍सना देण्‍यात आलेला नवीन लूक देखील आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा बदल आवडेल.''   

'रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी' या तीन प्रोफेशनल्‍सच्‍या जीवनाला सादर करण्‍यासह नैतिक पेचप्रसंगांची गुंतागूंत आणि सोप्या मार्गापेक्षा योग्य मार्ग निवडण्याच्‍या आव्‍हानाला दाखवते. जेनिफर विंगेट आणि करण वाही यांच्‍याव्‍यतिरिक्‍त या सिरीजमध्‍ये रीम शेख देखील आहे. 'रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी' दर सोमवार ते बुधवार रात्री ८ वाजता फक्‍त सोनी लिव्‍हवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :जेनिफर विगेंटकरण वाही