Join us  

'एक थी बेगम 2': ती आलीये..! पतीच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 6:48 PM

Ek Thi Begum 2: प्रेम तुम्हाला अनपेक्षित गोष्टी करण्यास भाग पाडतं. परंतु, सूडबुद्धीची आग तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास भाग पाडते, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.

ठळक मुद्देअभिनेत्री अनुजा साठे, अशरफ भाटकरच्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला जीवे मारण्याचा निश्चय करणाऱ्या सपनाचा जीवनप्रवास एक थी बेगम या वेब सीरिजच्या माध्यमातून उलगडण्यात आला. एम एक्स प्लेअवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यामुळेच आता या सीरिजचा दुसरा सिझनही प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या दुसऱ्या सिझनचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या सीरिजविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यातच आता पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लीला पासवान अर्थात अशरफ भाटकर सज्ज झाली आहे.

प्रेम तुम्हाला अनपेक्षित गोष्टी करण्यास भाग पाडतं. परंतु, सूडबुद्धीची आग तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास भाग पाडते, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. बहुप्रतीक्षित 'एक थी बेगम' चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून यात अभिनेत्री अनुजा साठे, अशरफ भाटकरच्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे. मात्र,  यावेळी ती लीला पासवान या नावाने सर्वांसमक्ष येणार आहे. 

Bigg Boss 3: बोल्ड परफॉर्मन्समुळे चर्चेत आलेल्या मिनल शाहच्या आई-वडिलांचा झालाय घटस्फोट

मकसूदचे बेकायदेशीर साम्राज्य उलथवून टाकण्याचा आणि तिचा पती झहीरच्या (अंकित मोहन) मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रतिज्ञेचे पालन करत, ती या सिझनमध्ये निर्भयपणे पुरुषांच्या जगात वर्चस्व गाजवताना दिसणार आहे. सत्तेतील प्रत्येकजण तिच्या शोधात आहे. अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारणी असे सगळेच. सिझन १ मध्ये अशरफच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आले आहे. ज्यात तिचा पती झहीर, एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन मकसूदचा (अजय गेही) विश्वासू होता, जो मारला गेला. त्यानंतर अशरफ सपना या नावाने बार डान्सर बनून झहीरच्या हत्येसाठी जबाबदार ठरलेल्या प्रत्येकाला मारण्याची योजना आखते. मात्र, तिच्या योजना निष्फळ ठरतात आणि सिझन १चा शेवट  होतो. परंतु, हा शेवट अशा एका टप्प्यावर येतो जिथे अशरफ जिवंत राहणार की नाही, हा प्रश्न उद्भवतो. मात्र, सिझन २ मध्ये अशरफच्या पुढील प्रवासावर भाष्य करण्यात आलं आहे. या प्रवासात ती लीला पासवान या नावाने अंडरवर्ल्डमध्ये फिरताना दिसणार आहे.

रणसंग्रामाला सुरुवात! पहिल्याच आठवड्यात सुरेखा कुडचीने मिळवला किचनवर ताबा

“गुन्हेगारी विश्वाने मला नेहमीच आकर्षित केले आहे. बंदुका आणि टर्फ युद्धांमुळे नाही तर या गुंडांवर राज्य करणाऱ्या अंतर्निहित भावनांमुळे. सिझन २ मध्ये सूड उगवण्याची भावना, ज्या गोष्टींच्या तुम्ही विरोधात आहात, त्याच गोष्टी करणे आणि या गोष्टी करताना तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या लोकांची किंमत मोजावी लागणे, हे दाखवण्यात आले आहे,'' असं लेखक, दिग्दर्शक सचिन दरेकर म्हणाले.

सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित या सीरिजमध्ये शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसटकर, नझर खान, हितेश भोजराज, सौरासेनी मैत्रा, लोकेश गुप्ते, मीर सरवर, पूर्णनदा वांडेकर आणि रोहन गुजर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एमएक्स ओरिजनल सीरिज  'एक थी बेगम २' चे सर्व भाग ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येतील

टॅग्स :अनुजा साठेवेबसीरिज