ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २७ - 'सत्यमेव जयते' या रिएलिटी शोमुळे समाजाकडे पाहण्याचा माझा जो द्ष्टीकोण होता तो बदलला असल्याची कबूली अभिनेता अमीर खान याने एका पत्रकार परिषदेत दिली.
समाजातील दुर्लक्षित राहिलेल्या अनेक पैलूवर प्रकाश पाडणारा 'सत्यमेव जयते -३' हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे. या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी अमिर खान पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यावेळी त्याने 'सत्यमेव जयते' मध्ये दाखवल्या जाणा-या कार्यक्रमाविषयी पत्रकारांना माहिती दिली. माहिती देताना अमिरचे डोळे देखील पाणावले होते. समाजात अनेक रुढी, परंपरा कायम असून काही गोष्टी तर मनाला पटणा-या नसतात. समाजात वावरणारी व्यक्ती इतकी कशी काय निर्दयी असू शकते असे सांगत समाजामध्ये घडणा-या काही गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे अमीर खानने सांगितले.