Join us

एकताच्या सिनेमात झळकायचंय? आधी न्यूडीटी क्लॉजवर सही करा

By admin | Updated: April 8, 2015 12:32 IST

एकता कपूरच्या सिनेमात झळकायंच असेल तर कलाकारांना आधी न्यूडीटी क्लॉजवर सही करावी लागणार आहे. या क्लॉजनुसार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कलाकारांना 'त्या' दृश्यांना आयत्या वेळी नकार देता येणार नाही.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ८ -  मालिकांमधून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरलेल्या एकता कपूरच्या सिनेमात झळकायंच असेल तर कलाकारांना आधी न्यूडीटी क्लॉजवर सही करावी लागणार आहे. या क्लॉजनुसार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कलाकारांना 'त्या' दृश्यांना आयत्या वेळी नकार देता येणार नाही. 
एकता कपूर सध्या  एक्सएक्सएक्स (XXX) या सिनेमाच्या निर्मितीमध्ये व्यस्त असून लैंगिकतेच्या विविध पैलूंवर भाष्य करणारी पाच कथानकं या चित्रपटात असतील. या बोल्ड सिनेमात काम करणा-या कलाकारांसाठी एकता कपूरने करारात न्यूडीटी क्लॉजही टाकला आहे. रागिनी एमएमएस २ या सिनेमामध्ये सनी लियोनीने आयत्या वेळी बोल्ड दृश्य करण्यास नकार दिला होता. यानंतर एकताने XXX  या सिनेमाच्या करारात न्यूडीटी क्लॉज ही वादग्रस्त अट टाकली आहे. कोणताही सिनेमा करताना कलाकारांना निर्मित्यांसोबत एक करार करावा लागतो. या करारात काही अटी शर्ती असतात. आता या अटीशर्तींमध्ये न्यूडीटी क्लॉजचा समावेश झाला आहे. यानुसार कलाकाराने सिनेमासाठी करार केल्यावर शूटिंग दरम्यान बोल्ड दृश्य करण्यास नकार देता येणार 
नाही. 'एक्सएक्सएक्स'चे दिग्दर्शक केन घोष यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. न्यूडीटी क्लॉ़ज हा या एका सिनेमापुरता मर्यादित नसून एकता कपूर प्रॉडक्शन हाऊसच्या सर्व सिनेमांमध्ये ही अट लागू होणार आहे.
एकताच्या या निर्णयावर बॉलीवूडमधील कलाकारांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र एकताने असा क्लॉज टाकूनही सेन्सॉर बोर्ड ती दृश्य दाखवू देतील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे.