नसिरुद्दीन शाह यांचा धाकटा मुलगा विवान शाह नुकताच ‘हॅप्पी न्यू ईअर’मध्ये दिसला होता. ‘गँगलॉर्डस् आॅफ १९८५’ या चित्रपटात तो एका डॉनची भूमिका साकारत आहे. विवानने त्याचा या चित्रपटातील लूक टिष्ट्वटरवर शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉकी खन्ना करीत आहेत. यात विवानसह गायिका आणि अभिनेत्री मोनिका डोगराही आहे. मोनिकाने यापूर्वी आमिर खानच्या ‘धोबीघाट’ या चित्रपटात काम केले होते. नसिरुद्दीन शाह यांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. कथा मुंबईतील ड्रग्ज तस्करीवर आधारित आहे.
विवान शाह बनणार डॉन
By admin | Updated: December 23, 2014 23:31 IST