Join us

‘डिस्को सन्या’ टीमची लोकमत आॅफिसला भेट

By admin | Updated: August 5, 2016 02:20 IST

तुफान डायलॉगबाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा डिस्को सन्या हा चित्रपट ५ आॅगस्ट (आज) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे

नाचीज को सन्या कहते है... डिस्को सन्या अशा तुफान डायलॉगबाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा डिस्को सन्या हा चित्रपट ५ आॅगस्ट (आज) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. एका गर्विष्ठ बिझनेसमॅन आणि सिग्नलवर विविध वस्तू विकणारा माणुसकी जपणारा एक चिमुरडा यांचा मजेशीर संघर्ष आणि संघर्षातून दोघांच्या आयुष्यात घडलेले बदल अशी या चित्रपटाची हटके कथा डिस्को सन्या या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे दिग्दर्शक नियाज मुजावर यांनी लोकमत आॅफिसला दिलेल्या भेटीदरम्यान सांगितले. या वेळी या चित्रपटाचे निर्माते सचिन पुरोहित व अभिजित कवठाळकरदेखील उपस्थित होेते. तर कलाकारांमध्ये पार्थ भालेराव, संजय खापरे, अशोककुमार भट्टाचार्य, रिषभ पुरोहित आदी उपस्थित होते. >निर्माते सचिन पुरोहित म्हणाले, गेली आठ ते दहा वर्षे अनाथ व वंचित मुलांसाठी मी व माझे कुटुंब सामाजिक कार्य करत आहोत. अशा या वंचित मुलांची जीवन जगण्याची उमेद आहे ती या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. या मुलांची जीवन जगण्याची उमेद पाहून मला ही कथा सुचली. मी, सचिन व नियाज यांना ही कथा ऐकवली. त्यानंतर लगेचच त्यांनीदेखील कथेला होकार दिला.>चित्रपटातील संगीताच्या बाजाबद्दल आपल्या कल्पना नेमक्या काय होत्या हे सांगताना निर्माते अभिजित कवठाळकर म्हणाले, या चित्रपटातील सगळी गाणी ही कथेला पुढे घेऊन जाणारी आहेत. ही गाणी प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी असून प्रत्येक गाण्याचे बीट्स, चाल, शब्दरचना हे सर्व काही अप्रतिम झाले आहे.>हरी विठ्ठला अल्ला हू अकबर हे गाणंदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच इतर गाणीदेखील खूप उत्तम आहेत. अवधूत गुप्ते, नंदेश उमप व आदर्श शिंदे यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी गाणी गायली आहेत. या चित्रपटाद्वारे बॉलीवूड गायक शबाब सबरी यांचे मराठीत पदार्पण झाले आहे.